अकोला सोसायटी ढाकणे गटाकडेच

अकोला सोसायटी ढाकणे गटाकडेच
Published on
Updated on

मोहटादेवी: पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुक्यातील अकोला सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मोहटादेवी जानपीर बाबा पॅनलने 13 पैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला.

माजी सरपंच अनिल ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील मोहटादेवी जानपीर बाबा पॅनलने 150 मतांंच्या फरकाने विजय मिळवत सेवा सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली. गेल्या 45 वर्षांपासून आपल्याकडे असलेली सत्ता राखण्यात यश मिळवले.विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. निवडणूक अधिकारी म्हणून जी,सी, देवळालीकर यांनी कामकाज पाहिले. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी विजयी संचालकाचा सत्कार करुन अभिनंदन केले.

या निवडणुकीत सुनील ढाकणे, सुखदेव गर्जे, नारायण गर्जे, मारुती पालवे ,बाबासाहेब बाळासाहेब गर्जे, सुभाष घुगे, विठ्ठल डुकरे, विजयकुमार पालवे, कुसुम धायतडक, अनिता गर्जे, संजय पंडित, प्रकाश थोरात हे सर्व उमेदवार सुमारे 150 मतांच्या फरकाने विजयी झाले. तर बाळासाहेब घायतडक, बाळासाहेब बबन गर्जे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले.

विजयानंतर पॅनल प्रमुख अनिल ढाकणे म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे करणार असून सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून सोसायटीची इमारत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू, तसेच सोसायटीच्या माध्यमातून फळबागेसाठी चालना देण्याचे काम करू, शेतकरी हिताच्या व त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news