बोटा : कार उलटली, एक ठार; आठ जण गंभीर जखमी

बोटा : कार उलटली, एक ठार; आठ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात दुपारी 3 वाजेच्या दरम्यान महामार्ग ओलांडणार्‍या शाळकरी मुलीला वाचवताना भरधाव कारवरील चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील विजय डेरे (वय 62, रा. नारायणगाव, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. वैष्णवी मेंगाळसह कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले.

नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब कार (क्र. एम.एच. 14 के.बी. 8714) मधून नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यास रस्त्यावर आली. यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी तिला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच पाच – सहा पलटी घेत 500 मीटरवर महामार्गाखाली पडली. रोहित विजय डेरे (वय 23), उज्वला विजय डेरे (वय 48), मोहित विजय डेरे (वय 30), सविता अनिल शेटे (वय 48), शैला दिलीप वारुळे (वय 58), विनायक शिवाजी डेरे (वय 50) (सर्व रा. नारायणगाव), शोभा दशरथ वायाळ (वय 54, रा. नांदूर, नाशिक) हे गंभीर जखमी झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news