पाथर्डी तालुका : नोकरीचे आमिष दाखवून युवकास लाखोंचा गंडा

पाथर्डी तालुका : नोकरीचे आमिष दाखवून युवकास लाखोंचा गंडा
Published on
Updated on

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : सैन्यदलात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवित, तालुक्यातील एकनाथवाडी येथील युवकाची फसवणूक करून त्यास लाखो रूपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अमोल विष्णू खेडकर असे फसवणूक झालेल्या युवकाचे, तर बापू छबू आव्हाड (रा. आंबेगाव ता. येवला, जि.नाशिक), सत्यजित भरत कांबळे (रा. आनंदवाडी, ता.श्रीगोंदा, जि.नगर) व राहुल सुमंत गुरव (रा.देवी बाभूळगाव, जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

या तिघांनी खेडकर यास सैन्यदलात भरती करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. सैन्यदलाचा गणवेष परिधान करून, खोटे फोटो, ओळखपत्र दाखवून खेडकर याच्याकडून वेळोवेळी एकूण 5 लाख 50 हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केली. याप्रकरणी खेडकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news