नेवाशाच्या मैदानात बसपा उतरणार

नेवाशाच्या मैदानात बसपा उतरणार

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवाशाचा पुढील आमदार ब हुजन समाज पार्टीचा झाला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन बसपाचे जिल्हा प्रभारी राजू खरात यांनी केले. प्रदेश अध्यक्ष संदिप ताजने यांच्या सुचनेनुसार व पश्चिम महाराष्ट्र राज्य झोन प्रभारी काळुराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी विधानसभेची समिक्षा बैठक नेवासा फाटा येथील वनविभागाच्या विश्रामगृहावर झाली.

नेवासा फाटा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन नेवासा तालुक्यात कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जातील. घराघरात शिव-फुले-शाहु-आंबेडकर यांचे विचार व बहुजन समाज पार्टीचा निती प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

यावेळी बहुजन समाज पार्टी नेवासा विधानसभेचे प्रभारी कमल सकपाळ, सुनिल घोरपडे, नेवासा विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बर्वे, उपाध्यक्ष किरण शिरसाठ, महासचिव पंकज हिवाळे तसेच सर्व बुथ कमिटी, सेक्टर कमिटी, कमिटीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नेवासा तालुकाध्यक्ष सोमनाथ बर्वे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news