नगर: श्रीरामपूरात वॉर्ड नं. 2 मध्ये दोन गटात तुफान हाणामार्‍या

नगर: श्रीरामपूरात वॉर्ड नं. 2 मध्ये दोन गटात तुफान हाणामार्‍या
Published on
Updated on

श्रीरामपूर (नगर), पुढारी वृत्तसेवा: मागील वादाच्या कारणावरून वार्ड नं. 2 मध्ये दोन गटांमध्ये जबर हाणामार्‍या झाल्या. या हाणामार्‍यात हत्यारांचा मुक्तपणे वापर करण्यात आला. यामध्ये एका तरुणास जबर मार लागल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि. 23) रात्री 10 च्या सुमारास वॉर्ड नं. 2 मधील वेस्टन चौकामध्ये एका तरुणावर काही जणांनी झडप घालून मारहाण केली. सदरची बाब दुसर्‍या गटास कळताच ते काठ्या-लाठ्या घेऊन बिफ मार्केटजवळ आले. त्यांनी संबंधिताला शोधून मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी तरुणांच्या या टोळक्यांनी आसपासच्याही अनेक लोकांना मारहाण केल्याचे सांगण्यात येते.

बिफ मार्केट परिसरात त्यामुळे रात्री 10 च्या दरम्यान मोठा जमाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी लावलेली एक चारचाकी गाडीही या जमावाने फोडली. या ठिकाणी झालेल्या मारहाणीत एक तरुण जबर जखमी झालेला आहे.

सदर मारामार्‍यांची माहिती मिळताच या ठिकाणी पोलिस फौजफाटा आला होता. रात्री उशिरा या ठिकाणी जमाव पांगवण्यात आला. याबाबत पो. नि. हर्षवर्धन गवळी यांच्याशी संपर्क साधला असता वादावादीचा प्रकार झाल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news