नगर : कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या नावांचे बॅनर

नगर : कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या नावांचे बॅनर
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नगर परिषदेमार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आक्रमक झालेल्या कोपरगाव नगरपालिकेने ढोल बजाव करत विशेष वसुली मोहिम सुरू केली. पाठोपाठ शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावांचे बॅनर झळकल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्याने या बॅनर बाजीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून या बॅनरला कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.

नगर परिषदेकडून सन 2022-23 या आर्थिक वर्षासह थकबाकीच्या 10 कोटी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागा भाडे आदींच्या वसुलीसाठी झोननिहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या वसुली मोहिमेसाठी शुक्रवारी (दि. 10) रोजी पालिकेने ढोल बजाव करीत रणशिंग फुंकले होते.

ज्यामध्ये मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करणे नळ जोडणी खंडित करणे, नगर परिषद व्यापारी संकुलनातील दुकानास सील ठोकने थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावे बॅनरद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहेत. असा इशारा पालिकेतर्फे दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. पाठोपाठ शनिवारी (दि. 11) रोजी दुसर्‍या दिवशी शहरातील सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आई तुळजाभवानी मंदिर, बाजारतळ या ठिकाणी थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर नगरपालिकेने लावले आहेत.

नगरपालिकेने वसुलीसाठी शहरातील चौका चौकात थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावले होते. पालिकेच्या या बॅनरबाजीचे तीव्र पडसाद उमटले; याचा तीव्र शब्दात निषेध करीत रस्त्यावर उतरलेल्या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिडीवर चढून बॅनरला काळे फासले व आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले, कोपरगाव शहरातील नागरिकांना पालिकेपासून मिळणार्‍या हक्काच्या मूलभूत सुविधा आठ दिवसाने मिळणारे पाणी स्वच्छता आरोग्य या गोष्टींची वाणवा आहे. कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून काही काळ कर थकबाकीसाठी सूट मिळाली असली तरी कोरोना संकट काळाने विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला वेळ लागणार आहे. असे असतानाही कर्ज वसुलीसाठी पालिकेकडून बॅनर बाजी करून थकबाकीदारांवर दबाव आणला जात आहे.

करवसुलीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. याबाबत थकबाकी धारकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. दुसरीकडे मोठी थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी पालिकेमध्ये जाऊन आपल्या थकबाकीचे हप्ते पाडून थकबाकी भरली पाहिजे, असेही ते म्हणाले ,यावेळी मंदार पहाडे, सुनील शिलेदार, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब रुईकर, रोहित खडांगळे, महेश उदावंत, सागर लकारे, धनंजय कहार,संतोष शेजवळ, गोरख कानडे, इम्तियाज आत्तार, नवाज कुरेशी, विकी जोशी, प्रकाश दुशिंग, आकाश डागा, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

पालिकेस सहकार्य करावे ः गोसावी
जे नागरिक व व्यापारी या मोहिमेत नगर पालिकेचा कर भरणार नाहीत अशा विरुद्ध जप्तीची मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news