अहमदनगर : एपीआय पवार लाचेच्या जाळ्यात; तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी

अहमदनगर : एपीआय पवार लाचेच्या जाळ्यात; तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करण्यासाठी तसेच जामिन मिळवून देण्यात मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोतवालीच्या सहायक पोलिस निरीक्षकाला रविवारी ताब्यात घेतले. दरम्यान, या कारवाईनंतर गुन्हा दाखल होण्यात बराच विलंब झाल्याने उलटसुलट चर्चा पोलिस दलात सुरू आहेत.

विवेक अशोक पवार (वय 32) असे लाचखोर पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने सापळा लावून रविवारी (दि.14) ही कारवाई केली. तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात बनावट खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता अटकपूर्वजामिन मंजूर करण्यात मदत करण्याच्या मोबदल्यात सहायक पोलिस निरीक्षक पवार याने तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात विवेक पवार याने लाच स्वीकारण्याची सहमती दर्शवली.

त्यामुळे पथकाने रविवारी छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीच्या बंदोबस्तातुनच पोलिस अधिकारी विवेक पवार याला ताब्यात घेत कारवाई केली.भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news