अकोले : अंगणवाडी कर्मचार्‍यांचा उद्या मुंबईमध्ये मोर्चा

अकोले : अंगणवाडी कर्मचार्‍यांचा उद्या मुंबईमध्ये मोर्चा

अकोले; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रतील अंगणवाडी कर्मचारी दि. 20 फेब्रुवारीपासून संपावर आहेत. अंगणवाडी संदर्भातील सर्व कामे बंद असून ठिकठिकाणी मोर्चे, धरणे आंदोलन सुरू आहेत. दि. 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रतील हजारो अंगणवाडी कर्मचारी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती अध्यक्षा अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी दिली आहे.

दि. 20 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पुणे येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतेय. शासनाने या आधिवेशनात मागण्या मान्य कराव्यात म्हणून अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्षा अ‍ॅड. निशा शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे आदींनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news