अहमदनगर : पिकअप-दुचाकीच्या धडकेत दोनजण जागीच ठार

अहमदनगर : पिकअप-दुचाकीच्या धडकेत दोनजण जागीच ठार

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने सायखिंडी येथे घरी जात असताना अचानक विरुद्धबाजूने समोरून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार आणि पिकअप चालक दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) सायंकाळी घडली. अजय चंद्रभान नन्नावरे (वय ३४, रा.सायखिंडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर या भीषण अपघातात पिकअप चालक विकास रवींद्र टोंबरे याचाही मृत्यू झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पिंपरने येथील गगनगिरी महाराज विद्यालयाचे शिक्षक अजय नन्नावरे हे पाच वाजता विद्यालय सुटल्यानंतर आपल्या मोटारसायकलवरून सायखिंडी या गावी जात असताना संगमनेर औद्योगिक वसाहती जवळ टाटा शोरूमच्या समोर विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने आलेल्या दुधाच्या पिकअप चालकाने समोरून जोराची धडक दिली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news