अहमदनगर : एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
अहमदनगर
अहमदनगर : श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
श्रीरामपूर (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली. सरफेस कोटिंग कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये एसटी कार्यशाळेच्या बाजूला असलेल्या एका ऑइल पेंट कंपनीला आज सोमवार दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे ही कंपनी जळून खाक झाली. यावेळी परिसरातील लोकांनी स्थानिक प्रशासनाला कळविले असून आजूबाजूला लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचलं का?

