जेव्हा आयुक्त करतात हरभरा पेरणी..! कृषी आयुक्त डॉ. गेडाम यांची ‘ग्रीनअप’ कंपनीस भेट

जेव्हा आयुक्त करतात हरभरा पेरणी..! कृषी आयुक्त डॉ. गेडाम यांची ‘ग्रीनअप’ कंपनीस भेट
Published on
Updated on

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या भेटी दरम्यान रब्बी हंगामातील हरभरा प्रकल्प लागवडीचा शुभारंभ केला. विशेष असे की, आयुक्त गेडाम यांनी ग्रीनअपचे सभासद संभाजी हापसे यांच्या शेतात ट्रेकटरद्वारे हरभर्‍याची संपूर्ण बीजप्रक्रिया करून पेरणी करुन उपस्थिताना थक्क केले.

अवघ्या तीन वर्षांत ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीची वाटचाल थक्क करणारी आहे. ग्रीनअपने राज्यात मिळविलेला नावलौकिक ग्रामीण युवकांना दिशा दाखवणारा असल्याचे मत राज्याचे नवनिर्वाचित कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी व्यक्त केले. 6 दिवसांपूर्वी राज्याचे नवे कृषी आयुक्तपदी डॉ. गेडाम यांनी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील ग्रीनअप कंपनीच्या कृषी विपणन मॉडेलची पहाणी करून माहिती घेतली.

ग्रीनअप कंपनीच्या शेतमाल खरेदी- विक्री, धान्य प्रतवारी, धान्य प्रक्रिया, स्मार्ट प्रकल्प, सीआयएफ प्रकल्प, महिला आधारित डिहायड्रेशन प्रकल्प, बियाणे विकास प्रकल्प आदी प्रकल्पांची आयुक्त गेडाम यांनी माहिती घेतली. भविष्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आव्हाने कमी करता येतील, असा विश्वास व्यक्त करीत, कृषी पूरक योजनांचा विस्तार करताना शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला केंद्रित घटकांना महत्व देणे गरजेचे असल्याचे गेडाम म्हणाले.

त्यांच्या समवेत कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा प्रकल्प संचालक विलास नलगे, सहसंचालक राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, ग्रीनअपचे चेअरमन अनिल हापसे, कार्य. संचालक सचिन ठुबे, आशुतोष धुमने, विनया बनसोडे, व्यवस्थापक आत्मा सुजित गायकवाड, भाऊसाहेब ढोकणे, बाळकृष्ण औटी, गणेश हापसे, सदाशिव येवले, आदिनाथ पटारे, अर्जुन ठुबे, अशोक गिरगुणे उपस्थित होते.

कृषी विस्तारात ग्रीनअप कंपनीचे योगदान मोठे..!

ग्रीनअपच्या टीमने मनापासून मेहनत करून शेतकरी उत्पादक कंपनीचे  महत्व राज्याला पटवून दिले. ग्रीनअपच्या मॉडेलमुळे शेतकर्‍यांच्या उन्नतीचा मार्ग सुकर झाला. आगामी काळात आयुक्त म्हणून मला ग्रीनअपकडून मोठ्या अपेक्षा असल्याचा अभिप्राय आयुक्त डॉ. गेडाम यांनी भेटीनंतर दिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news