जामखेड बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना

जामखेड बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : जामखेड बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना कार्यान्वित करण्यात असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिली. या योजनेचे प्रमुख उदिद्दष्ट वारंवार कमी होणारे शेतमालाचे बाजारभाव आणि त्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळणे हेच आहे.

शेतमालाचा बाजारभाव कमी निघाल्यास हा शेतमाल शेतकर्‍यांना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्याची सुविधा या योजनेमध्ये असून, वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या शेतमालाची पावती बाजार समितीकडे सादर केल्यानंतर बाजार समितीच्या माध्यमातून पणन मंडळास कर्ज पुरवठ्याची प्रक्रीया होणार आहे.शेतकर्‍यांना शेतमालाच्या एकूण किमतीच्या 70टक्के कर्ज सहा टक्के व्याजदराने देण्यात येईल.

यासाठी सहा महिन्याची मुदत असणार असून, गोदामात ठेवलेल्या शेतमालाला एक महिन्यासाठी प्रती 50 किलोसाठी आठ रुपये भाडे वखार महामंडळाने निर्धारीत करून दिले आहे. हा सर्व खर्च बाजार समितीकडून केला जाणार आहे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेला शेतमाल विमा संरक्षित असेल, शेतमालाला कीड लागणार नाही याची काळजी घेतली जाईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news