अभिनेत्री जुही चावलाचे शनिदर्शन

अभिनेत्री जुही चावलाचे शनिदर्शन

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  अभिनेत्री जुही चावला यांनी सोमवारी सकाळी शनिशिंगणापूरला येऊन शनिदर्शन घेतले. चावला यांनी शनी चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. शनिमहाराजांची महिमा ऐकून येथे दर्शन घेण्याची इच्छा झाल्याने काल दर्शनासाठी आल्या. दर्शनाने मनाला खूप आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले जनसंपर्क कार्यालयात शनिशिंगणापूर देवस्थानतर्फे विठ्ठल आढाव यांनी चावला यांचा सन्मान केला. यावेळी चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news