नगर : पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात! तीन वाहनांच्या धडकेत दोनजण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी

नगर : पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात! तीन वाहनांच्या धडकेत दोनजण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी
Published on
Updated on

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील नातेवाईकांचे लग्न समारंभ आटोपून परत जाणाऱ्या रिक्षाला पिकअपने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात पलटी झालेल्या पिकअप आणि रिक्षाला चारचाकी कारने पुन्हा धडक दिल्याने ही मोठी दुर्घटना घडली. पुणे-नाशिक मार्गावरील खांडगाव फाटा येथे हा या तीन वाहनांमध्ये धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, दोनजण गंभीर जखमी आहेत.

सोमवारी (दि. १०) मध्यरात्री ही घटना घडली.तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात रिक्षातील एक महिला व एक पुरुष असे २ जण ठार झाले, तर २ जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आशाबाई बबनराव चोथे (रा सुखसागर अंबा माता मंदिर पुणे) आणि राजेंद्र उत्तम शेळके (रा. शनी नगर आंबेगाव जिल्हा पुणे) अशी अपघातामध्ये ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे मार्गावरील, खांडगाव फाट्याजवळ संगमनेरहुन पुण्याकडे जाणाऱ्या रिक्षाला (क्र. एमएच १२ टीयु ३३१०) पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने (क्र. एमएच १७ सी व्ही ००२६) जोराची धडक दिली. या अपघातात पिकअप व रिक्षा पलटी झाला, मात्र पुन्हा एकदा या दोन वाहनांना पुण्याहून संगमनेरकडे जाणाऱ्या चारचाकी कारने (क्र एम एच १२ के जे ११८३) जोराची धडक दिली.

या अपघातात रिक्षातील आशाबाई बबन चोथे, दत्ता पांडुरंग व-हाडे, कल्याण लक्ष्मण चौथे, राजेंद्र उत्तम शेळके, हे चौघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ संगमनेरच्या मेडिकेव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील आशाबाई चोथे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तसेच राजेंद्र शेळके यांचा देखील उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

याबाबत मयत अशाबाई यांचा नातू राहुल चोथे यांनी संगमनेर शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित महाजन हे करत आहे.

पुणे मार्गावरील खांडगाव फाटा अपघात ग्रस्त ठिकाण

पुणे मार्गावरील खांडगाव फाटा हा अपघात ग्रस्त ठिकाण म्हणून ओळखले जात आहे या ठिकाणी कायमच अपघात होत असतात त्यामुळे खांडगाव फाटा हे अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जात आहे त्यामुळे या ठिकाणचे अपघात रोख ण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागा च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागण परिसरातील नाग रिक व प्रवासी वर्गातून होत आहे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news