भंडारा: विजेच्या धक्क्याने इमारतीवरून खाली पडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

भंडारा: विजेच्या धक्क्याने इमारतीवरून खाली पडून तरुणाचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारत असताना अचानक विद्युत तारांना स्पर्श झाल्याने ११ फुटांवरून खाली पडून तरुण गंभीर जखमी झाला. दरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इटान येथे घडली. रोशन देवराम दिघोरे (वय २६, रा. इटान) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, इटाण येथील रोशन देवराम दिघोरे हा शैलेश मोटघरे यांच्या गोडाऊन बांधकामावर मजूर म्हणून कामावर होता. सकाळी १० वाजताच्या सुमारास नवीन बांधकामावर पाणी मारत असताना अचानक ११ केव्ही गावठाण विद्युत प्रवाहाच्या तारांना त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे इमारतीवरून ११ फूट खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मडावी तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button