नगर : महिलेचे दोन तोळ्याचे मिनीगंठण चोरीस

नगर : महिलेचे दोन तोळ्याचे मिनीगंठण चोरीस

Published on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  आगडगाव येथील कालभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरट्याने लांबविले. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी घडली. याबाबत विजया गंगाराम झगडे (रा.भूषणनगर, केडगाव) या महिलेने सोमवारी (दि.7) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काळभैरवनाथ मंदिरात दर रविवारी महाप्रसाद असतो. या रविवारी आगडगाव गावातील सहाशे जावयांनी धोंड्याचा महाप्रसाद आयोजित केला होता.

त्यासाठी विजया झगडे मैत्रिणींसोबत आगडगाव येथे गेल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सायंकाळी घरी येवून कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर सोमवारी (दि.7) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news