नगर : अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

नगर : अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील तिसगाव येथे अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण (वय 28) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर शासन व्हावे, यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटना रात्री ठाण मांडून होत्या. या प्रकरणामुळे तिसगाव शहरात काही काळ वातावरण चिघळले होते. पोलिस अधिकारी व ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटातील व्यक्तींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या आरोपीने अनेक गुन्हे केले असून, त्याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आरोपीने मुलीची छेड काढली होती.

त्यावेळी स्थानिक पातळीवर तो वाद मिटविण्यात आला होता. हनुमान टाकळी येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी तिसगावच्या बसस्थानकावर उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी पठाण याने छेड काढून त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोन फोडला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिसगावच्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ यांनी कर्मचार्‍यांसह तिसगाव येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

तिसगाव येथे अल्पवयीन मुलींना झालेल्या छेडछाड व मारहाणप्रकरणी आरोपीवर मागील दाखल गुन्हे पाहता कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी करीत या निंदनीय घटनेबद्दल आज दि.3 जुलै रोजी तिसगाव बंदची हाक सकल हिंदू समाजाने दिली आहे. तसा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news