नगरमधील अकोले शहरात आदिवासी बांधवांचे वादळ!

नगरमधील अकोले शहरात आदिवासी बांधवांचे वादळ!
Published on
Updated on

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  9 ऑगस्ट  हा दिवस आदिवासी बांधवांचा अभिमानाचा दिन आहे. समाजाचे प्रेरणास्थान असणारे बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांना अभिवादन करीत अकोले शहर, राजूर परिसरात आदिवासी दिनानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत आदिवासी बांधवाबरोबर विशेषतः ठाकर समाजातील अनेक युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक कार्यक्रम, नृत्याचे, लेझीम आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील देवठाण येथे ठाकर समाजाने राया ठाकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार पं. सं. चे माजी सभापती मारुती मेंगाळ, दिपक पथवे यांनी घातला. भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आल्याने ठाकर समाज बांधवामधुन सामजिक एकीचे दर्शन दिसून आले.

अकोले शहरात (दि.9 ऑगस्ट आदिवासी दिन आ. डॉ. किरण लहामटे, माजी सभापती मारुती मेंगाळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवांनी साजरा केला. माजी आ. वैभव पिचड यांनी राजूर मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला. शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणुकीमध्ये कोल्हार घोटी राज्यमार्गावर अकोल्यात पाच ते सात हजार आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. शहरासह तालुक्यातील आदिवासी बांधव यात सहभागी झाले होते.

अकोले शहरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार 9 ऑगस्ट 1994 पासून जगात व आपल्या देशात 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आपले प्रेरणास्थान, श्रध्दास्थान आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे, राया ठाकर यांची जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या अकोले तालुक्यात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . आदिवासी समाज्यासाठी विर राघोजी भांगरे यांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे. आज ही या क्रांतिकारकाच्या शौर्याचा इतिहास हा या सोनेरी क्षणाची साक्ष देत सह्याद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात आदिवासी बांधवांच्या रुपाने नांदत आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने अकोले शहरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होऊन आदिवासी वादळ शहरात डीजे व वाद्याच्या तालावर थिरकताना दिसून आल्याची माहिती, माजी सभापती मारुती मेंगाळ यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news