

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तहसिल कार्यालयातील एका कर्मचार्याने शासकीय कागदपत्रं देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. मात्र, याची कुणकुण लागताच तो कर्मचारी पळून गेल्याने लाचलुचपत विभागाची कारवाई फेल गेल्याची शहरात चर्चा आहे. याबाबत चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचार्याने एका नागरिकाला शासकीय कागदपत्रं देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या बाबत संबंधिताने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधख विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार बुधवारी (दि.13) रोजी संबंधित कर्मचार्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. या सापळ्याची कुणकुण लागताच कर्मचार्यानेे तहसील कार्यालयातून धूम ठोकल्याची माहिती मिळाली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधख विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी असा कोणताही सापळा रचल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला नाही.
हेही वाचा :