नगर : नळपाणी योजनेच्या कामाला ब्रेक ; आनंदवाडी गावातील नागरिकांचा उपोषणाचा इशारा

नगर : नळपाणी योजनेच्या कामाला ब्रेक ; आनंदवाडी गावातील नागरिकांचा उपोषणाचा इशारा

काष्टी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी गावातील नागरिकांना जलजीवन अंतर्गत दोन कोटी 30 लाख रुपयेची नवीन नळ पाणी योजना मंजूर आहे. गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी योजनेचे स्वतःला श्रेय मिळाले नाही म्हणून अधिकार्‍यांना सांगून काम बंद ठेवले. यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत मंजूर योजनेचे काम लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदे समोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती शिवाजी नलावडे व ग्रामसथांनी दिली. या संदर्भात संबंधित विभागातील अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील आनंदवाडी येथे ग्रामस्थांना पिण्यासाठी लोकसंखेच्या आधारे जलजीवन मिशनअंतर्गत एक कोटी 33 लाख रुपयेची दोन लाख 10 हजार लिटर पाण्याची टाकी बांधून संपूर्ण गावाला पाणी मिळेल अशी योजना मंजूर करून घेतली. योजनेचे काम तालुक्यातील स्मार्ट टेक कंनस्ट्रक्शनला मिळाले. वर्क आडर मिळून सात महिने झाले. ठेकेदाराला योजनेचे पाईप खरेदीसाठी 30 लाख रुपये ऍडव्हान्स मिळाले. साईटवर पाईप येवून पडले. मात्र, त्यापुढे काहीच झाले नाही. याची विचारणा केली असता, हे काम उपअभियंता लघुपाटबंधारे व श्रीगोंदा ग्रामीण पाणी पुरवठा विभागच्या तोंडी आदेशाने थांबविले असे ग्रामस्थांना सांगितले.

उपअभियंता सुरेश कराळेंकडे विचारणा केली असता, 'ते म्हणाले फेर इसटीमेट करण्याचे काम चालू आहे. तोपर्यंत काम चालू करू नका असे सांगितले. शेवटी 27 मार्च रोजी फेर अंदाजपत्रक तयार करून तातडीने काम सुरू करण्याबाबत ग्रामसथांनी मागणी केली. मात्र, नंतर नवीन दोन कोटी 30 लाख रुपयेचे अंदाजपत्रक तयार केले; परंतु यामध्ये दोन लाख 10 हजार लिटरची पाण्याची टाकी 70 हजार लिटरवर का आनली. याचे ग्रामस्थांना उत्तर मिळावे. घटनेला चार महिने झाले तरी मंजूर पाणी योजनेचे काम सुरू होईना, पावसाळा तोंडावर आला आहे.

अनेक ठिकाणी वस्तीवर पाणी योजनेचे पाईपलाईन खोदाई करून फिरविण्यासाठी जमिनी मोकळ्या आहेत. पाऊस झाला तर शेतात शेतकर्‍यांची पिके उभी राहतील. उभ्या पिकात शेतकरी खोदाई करून देणार नाही. इतर गावातील योजना पूर्ण होत आल्या; परंतु आमची योजना बंद आहे. जलजीवन मिशनच्या मंजूर योजनेचे काम आठ दिवसात सुरू झाले नाही तर, जिल्हा परिषदेच्या दारात आंनदवाडी येथील सर्व ग्रामस्थ बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद, पोलिस ठाणे, अभियंता, उपअभियंता व ठेकेदाराला देण्यात आलेल्याची माहिती नलावडे यांनी दिली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news