शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणार : मंत्री दीपक केसरकर | पुढारी

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणार : मंत्री दीपक केसरकर

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल, तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली, असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. अध्यक्षस्थानी महासंघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात होते. नगरमधील कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत मंत्री केसरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

संभाजी तात्यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघ राज्यात सक्षमपणे काम करत असून संघाच्या व्यासपीठावरील प्रश्न तातडीने निकाली काढले जातील, असेही ते म्हणाले . यावेळी पुढे बोलताना केसरकर यांनी एमएससीआयटी परीक्षेबाबतीचा ही सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे असे म्हटले व प्राथमिक शिक्षकांना 10-20-30 ही आश्वासित प्रगती योजना ही तातडीने अंमलात आणली जाईल, असेही आश्वस्त केले. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुधीर तांबे, राज्याचे नेते संभाजी थोरात, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, माजी संचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदीसह महिला आघाडीच्या नेत्या जयश्री झरेकर, संगीता कुरकुटे, स्वाती झावरे आदी उपस्थित होते.

खा. डॉ. विखे, आमदार जगतापांकडून ग्वाही

याप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढला जाईल, असे सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनीही मी आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

आमदार प्रशांत बंब यांचा बंदोबस्त करा!ञ्च्

शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून आमदार प्रशांत बंब यांचा बंदोबस्त सरकारने करण्याची आग्रही मागणी केली. शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय! डॉ. संजय कळमकर यांनी माहिती अधिकारात काहीजण मुख्यालयाच्या प्रश्नावरून शिक्षकांना जाणीवपूर्वक अडचणीत आणत असल्याने मुख्यालयाची अट रद्द करण्याची मागणी केली.

‘या’ दोन शिक्षक नेत्यांमुळे संघास बळकटी!

राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत करून डॉ. कळमकर व रावसाहेब रोहोकले सोबत आल्याने संघ बलाढय झाला असून, यापुढे जिल्ह्यातील व राज्यातील प्राथमिक शिक्षकांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ हे हक्काचे व्यासपीठ असल्याचे म्हटले. डॉ.कळमकर राज्य संपर्क पदी; रोहोकले उपनेते संजय कळमकर यांची संघाच्या राज्य संपर्क पदी व रावसाहेब रोहोकले यांची उपनेतेपदी निवड करीत असल्याची घोषणा संभाजीराव थोरात यांनी करताच सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन देण्यात आले.

शिक्षकांची प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प

मुख्यालयाची अट रद्द करणे किंवा तिला स्थगिती देणे, एमएससीआयटी परीक्षा विहित काळात न दिल्याने होणारी कपात थांबवणे व झालेली कपात शिक्षकांना पुन्हा मिळवून देणे, जिल्हातर्गत शिक्षक बदली प्रक्रिया राबवणे अशा अनेक प्रश्नांवर त्वरित बैठक पार लावून आदेश निर्गमीत करू, असे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितल्याचे राज्यनेते संभाजीतात्या थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा

 

Back to top button