Nagar : केडगाव अंबिकानगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी | पुढारी

Nagar : केडगाव अंबिकानगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

नगर : केडगाव अंबिका नगर परिसरामध्ये बिबट्या दिसून आला, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून दरम्यान नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्या दिसताच नागरिकांनी वन विभागाला फोन केला परंतु वनविभागाचा थंड प्रतिसाद यामुळे वनविभागाची उदासीनता दिसून आली. सकाळी 11 वाजता नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते तेव्हा एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून प्रशासनाच होत जाणारं दुर्लक्ष हे नागरिकांच्या जीवावर उठलं आहे. मानव-प्राणी संघर्ष तीव्र होत चालला आहे. याकडे गांभीर्याने बघायला हवं. नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा

Back to top button