जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे 9 फेब्रुवारीला निवड चाचणी | पुढारी

जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे 9 फेब्रुवारीला निवड चाचणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे येथील कै. विठोबा मारुती स्टेडियम खराडी येथे 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कुमार गट 17 वर्षांखालील तसेच वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी ’किताब 2023-24 साठी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे 9 फेब्रुवारी रोजी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालय येथे निवड चाचणी स्पर्धेचे होणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली. राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी ’किताब 2023-24 या करिता अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने होणार्‍या निवड चाचणीसाठी येताना कुस्तीगीरांनी मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, बोनाफाईड सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्र सोबत आणावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Back to top button