Nagar : चित्र प्रदर्शनास आमदार नीलेश लंके यांनी दिली भेट | पुढारी

Nagar : चित्र प्रदर्शनास आमदार नीलेश लंके यांनी दिली भेट

निघोज : पुढारी वृत्तसेवा : पारनेर, तसेच इतर भागातील निसर्ग काय आहे याची प्रत्यक्ष कलाकृती चित्रकलेच्या माध्यमातून दाखवीत सुरेश भोसले यांनी दरोडीचे आणि विशेष करून तालुक्याचा नावलौकिक मुंबईनगरीत केला असून, ते एक अद्वितीय कलाकार असल्याचे गौरवोद्गार आ. नीलेश लंके यांनी काढले. तालुक्यातील दरोडी गावचे सुपुत्र चित्रकार सुरेश भोसले यांच्या जहांगीर कलादालनात सुरू असलेल्या जलरंग 24 या चित्र प्रदर्शनास दिलेल्या भेटीप्रसंगी आ. लंके बोलत होते. भोसले यांच्याशी कलेविषयी बोलताना आ. लंके यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील कलेविषयीच्या आठवणींनाही उजाळा दिला.

भोसले यांनी चित्रकलेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील निसर्ग चित्र, तसेच राज्यातील इतर भागांतील चित्र रेखाटत कलेचा महासागर उभा केला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन भरविण्याचा सन्मान त्यांना चौथ्यांदा मिळाला हे तालुक्याचे भाग्य म्हटले पाहिजे. भोसलेंसारखा कलाकार हा तालुक्याचा नव्हे, तर जिल्ह्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार आ. लंके यांनी काढत भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.

हेही वाचा

Back to top button