शिर्डीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड | पुढारी

शिर्डीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डीत द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. त्यात पोलिसांनी चार परप्रांतीय महिलांची सुटका केली असून, अनैतिक देहव्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करून एजंट महिलेला अटक केली आहे. शिर्डी शहरातील पिंपळवाडी रस्त्यावरील हॉटेल शिर्डी साई इन येथे गुरुवारी पोलिसांनी हा छापा टाकला. तेथे तेथे द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांना समजले होते.

त्यास अनुसरून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि लगेच छापा टाकला. त्यात चार परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली आणि एका महिला एजंटला अटक करण्यात आली. शिर्डी पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या रॅकेटमध्ये आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक सोपान शिरसाठ, सहायक निरीक्षक योगीता कोकाटे, पोलिस कर्मचारी इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर, श्याम जाधव, दिनेश कांबळे, सोमेश गरदास, आप्पासाहेब थोरपिसे यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा :

Back to top button