LPG Price | मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात | पुढारी

LPG Price | मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1757 रुपये झाली आहे. 1 डिसेंबररोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता सिलिंडर स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. LPG Price

मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1710 रुपये असेल. तर कोलकातामध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1868.50 रुपये असेल. चेन्नईमध्ये ही किंमत 1929 रुपये असेल. राज्य पातळीवरील करांमधील फरकामुळे किमतीतील हा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस (CP) हा LPG किंमतीसाठी बेंचमार्क मानला जातो. गेल्या आठवड्यात सीपीने जास्त पुरवठा झाल्यामुळे एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही भाव घसरले आहेत. LPG Price

देशातील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसचे दर ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती लक्षात घेऊन ही किंमत ठरवली जाते.

LPG Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

घरगुती एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यानंतर 14.2 किलो सिलिंडरची किंमत फक्त 903 रुपये राहील. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

हेही वाचा 

Back to top button