नगर मनपाची 70 कोटी वसुली

नगर मनपाची 70 कोटी वसुली
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका वसुली विभागाने तब्बल 70.15 कोटी रुपयांची वसुली केली आहे. शेवटच्या तीन दिवसांत वसुलीचा आकडा वाढला आहे. महापालिकेच्या मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकीत कर आहे. वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ताधारक कर भरण्याकडे कानाडोळा करतात. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी वसुली विभागाला कडक मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वसुली विभागाने अनेकांची मालमत्ता सील केल्या तर, अनेकांचे नळकनेक्शन बंद केला. दुसरीकडे वीस टक्यांपेक्षा कमी वसुलीचा आकडा असणार्‍या कर्मचार्‍यांनाही दंड केला. दि.31 मार्च अखेर महापालिकेची मागील व चालू अशी 249 कोटींपैकी 70.15 कोटींची वसुली झाली. ही वसुली गतवर्षीपेक्षा जास्त आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news