Nagar Crime News : पसार आरोपीवर खुनी हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा  | पुढारी

Nagar Crime News : पसार आरोपीवर खुनी हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा 

नगर : पुढारी वृत्तसेवा : गामा भागानगरे खूनप्रकणातील पसार आरोपी संतोष अविनाश सरोदे आज सकाळी नगरमध्ये आला असता चार जणांनी त्याचे अपहरण केले. माळीवाड्यातील फुलसौंदर चौकात नेवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार घोलप, कृष्णा भागानगरे, भय्या बीडकर व एका अनोळखी व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे. संतोष सरोदे याने फिर्यादीत म्हटले, पाच ते सहा महिन्यांपूर्वी मित्रांमध्ये भांडण झाले होते.
त्या भांडणाच्या भीतीपोटी पुणे येथे निघून गेलो होतो. शुक्रवारी सकाळी पुणे बसस्थानकावर उतरून बालिकाश्रम रोडने भुतकरवाडीकडे जाताना चौघे पाठीमागे आले. प्रेमदान चौकाकडे बहिणीकडे जाण्यासाठी निघालो असता ओंकार घोलप याने जवळ येऊन मोटारसायकलवर बसविले. त्यानंतर वरील चौघांनी माळीवाड्यातील फुलसौंदर चौकात नेले. तिथे चौघांनी दांडक्याने मारहाण केली. जखमी संतोष सरोदे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार आहे.
हेही वाचा

Back to top button