मुंबई : गिरगाव चौपाटी येथील इमारतीला आग; दोन नागरिकांचा मृत्‍यू | पुढारी

मुंबई : गिरगाव चौपाटी येथील इमारतीला आग; दोन नागरिकांचा मृत्‍यू

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा गिरगाव चौपाटी येथील गोमती भवन या इमारतीला (शनिवार) रात्री आग लागली. ही आग आज (रविवार) पहाटे विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत ९ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली असून, या आगीत दोन वयोवृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गिरगाव चौपाटी येथे गोमती भवन ही तळ अधिक तीन मजली इमारतीला काल रात्री आग लागली होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात शनिवारी रात्री ९.३२ वाजता आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या ठिकाणाहून अग्निशमन दलाने ९ जणांना सुखरूप बाहेर काढले.

याच इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घरात दोन मृतदेह अग्निशमन दलाला आढळून आले. हे दोन्ही मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हिरेन शाह (वय ६० वर्षे) आणि नलिनी शाह (८२ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. इमारतीतील आगीवर ३.३५ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

हेही वाचा :

Back to top button