पुणे भाजपचा फर्ग्युसन रस्त्यावर जल्लोष | पुढारी

पुणे भाजपचा फर्ग्युसन रस्त्यावर जल्लोष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने गोखले स्मारक चौक (गुडलक हॉटेल शेजारी कलाकार कट्टा ) येथे डिजेच्या तालावर जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह भाजपचे पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी सहभागी झाले होते. हाती भाजपचे झेंडे घेऊन डीजेच्या तालावर नाचण्यासह भगवा गुलाल उधळून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे भाजप प्रभारी माधव भांडारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Assembly Election Results : मोदीजींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली! चंद्रशेखर बावनकुळे

कोल्‍हापूर : सुळे येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

सिधुदर्ग : नौसेना दलाचे व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी घेतले रामेश्वराचे दर्शन

Back to top button