

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील 10 मंडलामध्ये रविवारी अवघ्या एका दिवसात 50 मि. मी. पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. या आवकाळी पावसाने तालुक्यातील 13 गावातील 215 शेतकर्यांच्या 230 हेक्टरवरील द्राक्ष व कपाशीचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तसेच वादळ वार्यामुळे तालुक्यातील काही भागात रस्त्यावर झाडे उमळून पडली तर विविध गावातील 10 घरांची अंशत पडझड झाली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये चालूवर्षी खरीप पेरण्याच्या वेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस झाला. त्या पावसावर शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या.
संबंधित बातम्या :
परंतु नंतरच्या काळात पावसाने उघडीप दिली. यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा वाया गेल्या . पावसाच्या विवंचनेत शेतकरी असताना संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला तरी सुद्धा मान्सूनच्या पावसाने धरण क्षेत्र वगळता कुठेही बर्यापैकी हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला होता. पावसाळा संपल्यानंतर आता रब्बी हंगामात तरी पाऊस चांगली हजेरी लावेल, अशी अपेक्षा शेत कर्यांना होती. परंतु तीही फोल ठरली.
आवघ्या एकच दिवसात आवकाळी आलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडून दिली. सरासरी 50 मी. मी. पेक्षा ज्यास्त पाऊस पडल्याने रब्बी हंगामा मधील पिकांना खर्या अर्थाने नवसंजीवनी मिळणार असली तरी या अवकाळी पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी, शिबलापूर भागातील कापूस उत्पादक शेतकर्यांना तसेच पश्चिम भागातील जवळे कडलग, निमगाव, भोजापूर, राजापूर,व सायखिंडी या भागात असलेल्या द्राक्ष आणि डाळिंब बागांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच इतर भागात कांदा, टोमॅटो, भाजीपाला, चारा पिके आणि ऊस या पिकांनाही मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चांगलेच संकटात सापडले आहे.
संगमनेर तालुक्यात 50 मि. मी .पाऊस
संगमनेर तालुक्यातील आश्वी मंडलात सर्वाधीक 72.3 मि. मी. तर त्या खालोखाल तळेगाव मंडळामध्ये 70.3 मि. मी., शिबलापूर 67 मी. मी., पिंपरणे 60 मि. मी., समनापूर 50.5 मि. मी., साकूर 43 .8, धांदरफळ 42 .3 तर सर्वात कमी घारगाव आणि डोळासणे मंडळात प्रत्येकी 23.5 मि. मी. प्रत्येकी मि. मी. पाऊस पडला असल्याची नोंद प्रत्येक मंडला मधील पर्जन्यमापक यंत्रावर झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना दिली.