Nagar Crime News : जागेच्या वादावरून कारने चिरडून मायलेकांची हत्या | पुढारी

Nagar Crime News : जागेच्या वादावरून कारने चिरडून मायलेकांची हत्या

पारनेर : पारनेर येथे कुंभार गल्लीत राहणाऱ्या एका मायलेकाला भरधाव वेगाने आलेल्या कारने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. जागेच्या मोजणीच्या वादावरून आरोपीने मायलेका च्या अंगावर गाडी घालून हत्या केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार एका विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर शहरातील कुंभार गल्ली येथे राहणाऱ्या शीतल अजय येणारे वय 27 व त्यांचा मुलगा स्वराज अजय येणारे वय अडीच वर्ष हे दि.23 रोजी आपल्या घराच्या ओट्यावर बसले असता संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपी किरण राजाराम श्रीमंदिलकर हा पोलो कंपनीची क्रमांक एम एच बारा आर टी 2777 या कारने भरधाव वेगाने येत त्यांच्या घरासमोरील पाचशे लिटर पाण्याच्या टाकीला जोराची धडक दिली त्या समोरच बसलेल्या शीतल व स्वराज यांना देखील कारने चिरडले, यामुळे शितल येणारे यांना जबर दुखापत झाली,

तसेच स्वराजच्या डोक्याला मार लागल्याने तोही बेशुद्ध पडला. धडक दिल्यानंतर शीतल येणारे यांना कारने काही अंतर फरपटत नेले. त्या कारमध्ये दाबल्या गेल्या होत्या. परिसरातील तरुणांनी कार उचलून शितल यांना बाजूला काढले. त्यानंतर त्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांना नगर येथे हलवण्यात आले. तत्पूर्वी शितल येणारे यांचा मृत्यू झाला स्वराज यास नगर येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला पुन्हा विळद घाटातील विखे फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दोघांचे सेवेच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, नातेवाईकांनी दोघांचे अंत्यसंस्कार केले.

दरम्यान पारनेर पोलीस स्टेशनमध्ये उशिराने गुन्हा दाखल झाला. यात आरोपी किरण राजाराम श्रीमंदिलकर त्याच्या विरोधात घराच्या जागेच्या मोजणीच्या कारणावरून ठार मारण्याचे उद्देशाने गाडी अंगावर घालून दोघांना ठार मारले असल्याचे गुन्ह्यात नमूद करण्यात आले. आहे त्यानुसार आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड करत आहेत.

  • अजय येणारे यांचा पारनेर बाजार तळावर मच्छ व्यवसाय आहे या व्यवसायात पत्नी शीतल येणारे हे त्यांना मदत करत असे दोघेही दापत्य अतिशय कष्टाळू व मेहनती असल्याने व्यवसायात चांगला जम बसवला होता. मात्र या दुर्दैवी घटनेत आई व मुलगा याचा मृत्यू झाल्याने अजय येणारे हे एकाकी पडले. मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पारनेरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

Pune News : शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांचा ठिय्या!

मुंबई : न्या. शिंदे समितीला सापडल्या पस्तीस लाख कुणबी नोंदी

कोल्हापूर : ऊस दराच्या कोंडीला जबाबदार कोण?

Back to top button