अहमदनगर : २५ वर्षे खासदारकी असताना काय केले?; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना सवाल | पुढारी

अहमदनगर : २५ वर्षे खासदारकी असताना काय केले?; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना सवाल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात सुरु असणारे विकास कामे थांबविण्यासाठी तुम्ही इकडे येतात. मात्र आम्ही राहता तालुक्यामध्ये चांगले करण्यासाठी जात असतो गेली. ३५ वर्ष आपल्या घरातही खासदारकी होती. तेव्हा तुम्ही संगमनेर तालुक्यासाठी काय केले? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केला. निळवंडे धरणाचे डाव्या कालव्याद्वारे पाणी संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागात आले त्या निमित्ताने निळवंडे येथे डाव्या कालव्यातील पाण्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वडगाव पान येथे पंचक्रोशीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर. माजी आ. डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष प्रतापरावओहोळ माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे बाजार समितीचे सभापती ,शंकर खेमनर, शेतकी संघाचे चेअरमन संपतडोंगरे,अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, रामहरी कातोरे अजय फटांगरे आदी मान्यवर उपस्थित होते

थोरात म्हणाले, पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे डाव्या कालव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी निळवंडे योगदान देणारे कोणीही नव्हते. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लाहामटे तसेच प्रकल्पग्रस्त व कामगार यांना कुणालाही बोलविले नव्हते. यांचे निळवंडेच्या कामामध्ये योगदान नाही. अशी टीका त्यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button