Heena Gavit: भादल गावाला स्वातंत्र्यानंतर मिळाला रस्ता; खा. हिना गावित यांचा पाठपुरावा

Heena Gavit: भादल गावाला स्वातंत्र्यानंतर मिळाला रस्ता; खा. हिना गावित यांचा पाठपुरावा

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेश – महाराष्ट्र सीमेवरील नर्मदा काठाच्या भादल या दुर्गम गावाला खासदार डॉ. हिना गावित यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी सुरू असलेल्या पक्क्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या गावात प्रथमच कोणी उच्चपदस्थ, राजकीय व्यक्ती आमच्याशी संवाद साधायला आला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली. Heena Gavit

तोरणमाळपासून खाली उतरल्यानंतर अनेक गावे, पाडे दुर्गम भागात वसलेले आहेत. उडद्या ते भादलपर्यंत ५६ किलोमीटरचे अंतर स्थानिक रहिवाशांना पायी चालून पार करावे लागत होते. २०१४ मध्ये खासदार गावित या पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीतून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी सर्वप्रथम या भागात रस्ता मंजूर केला. वनविभागाच्या कायदे नियमांच्या अडथळ्यात रखडलेल्या या रस्त्याच्या कामाने आता गती घेतली आहे. सातपुडाच्या पायथ्याशी मध्यप्रदेश सीमेपर्यंत डोंगराळ भागातील पहिला रस्ता आकाराला येत आहे. त्याची पाहणी खासदार गावित यांनी केली. Heena Gavit

तोरणमाळ परिसरातील अनेक गावे, पाडे येथील रस्ते, वीज, पाणी आणि अन्य सुविधांबाबत असलेली दुरवस्था दूर करण्यासाठी मी खासदार बनले आहे. भादल गावासह नर्मदा काठच्या दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. बारमाही पक्के रस्ते, वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. पक्की घरे बांधून दिली जातील, अशी ग्वाही खा. डॉ. गावित यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, सुरेखा लतेश मोरे, अॅड. जयश्री गावित, ॠषा गावित, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पराडके, नंदुरबार येथील भाजपाचे संतोष वसईकर, माजी गटनेते आनंद माळी, मांगूभाऊ माळी, भादलचे सरपंच बुरकाताई पावरा, सिंधी दिगरचे सरपंच संदीप पावरा आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news