Nagar : ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला ; रविवारी मतदान | पुढारी

Nagar : ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला ; रविवारी मतदान

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराने गावागावांत राजकीय धुरळा उडाला असून, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. रविवारी (दि.5) ग्रामपंचायतींच्या 1 हजार 697 सदस्यपदासाठी आणि 175 ठिकाणी सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या 194 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. सरपंचपदाची थेट जनतेतून निवड होणार असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींची निवडणूक रंगतदार होत आहे. 194 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतींचे सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.

संबंधित बातम्या :

तसेच सदस्यपदाच्या 337 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी 175 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तर 1 हजार 697 सदस्यपदासाठी मतदान होणार आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तासांपूर्वी जाहीर प्रचार थांबला जातो. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. रविवारी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. अहमदनगर तालुक्यातील वडगाव गुप्तासह सहा ग्रामपंचायतींचा प्रचार आज थांबणार आहे. रविवारी 20 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शनिवारी तहसील कार्यालयात सकाळी मतदान साहित्याचे वाटप होणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन मतदान ठिकाणी रवाना होणार असल्याचे नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी सदस्यसंख्या (कंसात सरपंच)
संगमनेर : 59 (5), कोपरगाव : 174 (17),
श्रीरामपूर : 147 (13), राहाता : 141 (12)
राहुरी : 329 (21), नेवासा : 115 (16)
नगर : 68 (6), पारनेर : 59(6),
पाथर्डी : 116(14), शेवगाव : 240 (27), कर्जत : 44 (5),
जामखेड : 28(3), श्रीगोंदा : 109 (9), अकोले : 68 (21)

Back to top button