

पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाला कालपासून हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत. यामुळे अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक व पुणे बस स्थानक येथे शुकशुकाट दिसून आला. बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बस बंद असल्याचा फायदा खाजगी वाहतूकदारांकडूनघेतला जातो आहे. अव्वाच्या सव्वा तिकीटदर आकारून प्रवाशांची लूट होत आहे.
हेही वाचा :