Nagar News : झोळे येथे आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले | पुढारी

Nagar News : झोळे येथे आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  एक मराठा लाख मराठा,आम्ही जातो आमच्या गावा,आम्हाला आरक्षण नसल्या मुळे मी फाशी घेत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये, अशी वहीमध्ये चिठ्ठी लिहून ठेवत सागर भाऊसाहेब वाळे ( वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्म त्या केली असल्याची घटना संगमनेर तालु क्यातील झोळे गावात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. मराठा आरक्षणासाठी संगमनेर तालुक्यातील पहिल्या तरुणाचा बळी गेला असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे या गावातील सागर भाऊसाहेब वाळे याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्या संगमनेर येथे खाजगी नोकरी करत आहे.  त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी त्यांच्या घराजवळील पडवीला लटकलेल्या अवस्थेत वडील भाऊसाहेब वाळे यांना आढळून आला.

त्यानंतर त्यांना जबरदस्त धक्काच बसला. त्यावेळी त्याच्या अंथरुणावर असलेल्या वहीत एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत आम्ही जातो आमच्या गावा एक मराठा लाख मराठा,आम्हाला आर क्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे.यात कोणाला जबाबदार धरू नये, असे त्या चिठ्ठीत लिहिण्यात आले होते. या घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरली. पोलिसांना माहिती समज ताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. त्यांनी पंचायत समक्ष सागर वाळे या तरुणाने लिहून ठेवलेली चिट्ठी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याचा मृतदेह खाली उतरून शविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सागर वाले या तरुणावर शोकाकुल वातावरणात झोळे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.नेमके हे अक्षर सागरचे आहे की अन्य कोणाचे आहे याचा पोलीस तपास घेत आहे. या बाबत संगमनेर तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button