मराठे आक्रमक ! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर टाकला बहिष्कार

मराठे आक्रमक ! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर टाकला बहिष्कार

शेवगाव : प्रतिनिधी :  मराठा समाज आरक्षण मागणीवरून शिर्डी येथे आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे.  शेवगाव तालुक्याच्या अनेक गावात सभेला जाण्यास आलेल्या बसेस गावागावातून रिकाम्या पाठविण्यात आल्या. तर मंगरुळ येथे बसच्या काचा फोडण्यात आल्या. रिकाम्या आलेल्या सर्व बसेस पाथर्डी रोडवरील तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षन संस्थेच्या आवारात लावण्यात आल्या आहेत.

तालुक्यात शेवगावसह इतर आगाराच्या ५६ एस.टी.बसेसची सुविधा करण्यात आली होती मात्र सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जवळपास ३५ बसेस परत पाठविण्यात आल्या. गावागावात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरुण आक्रमक झाला होता. त्यांनी गावात सभेसाठी जाणाऱ्या बसेसला अडवले व बसेसवर असणारे सभेचे पोस्टर फाडून त्यांना हाकलून दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news