अकोले, पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे जलाशय लोकार्पण सोहळ्यासाठी येत असल्याने खा.सदाशिवराव लोंखडे यांनी निळवंडे जलाशयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या परिसरात प्रतिबंध करण्यात आला असून विरोधी पक्षातील नेत्यांना आंदोलन अथवा होणाऱ्या हालचालींना प्रतिबंध करण्यात आला आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि त्याच्या डाव्या काठाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. निळवंडे धरणाच्या डाव्या बाजूच्या ८५ किमी) कालव्याचे लोकार्पण करतील. याचा लाभ ७ तालुक्यांतील १८२ गावांना तर अहमदनगर जिल्ह्यातील ६ आणि नाशिक जिल्ह्यातील पाणी पाईप वितरण नेटवर्कच्या सुविधेसह होणार आहे.
निळवंडे धरणाची कल्पना सर्वप्रथम १९७० मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे ५१७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे. जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी निळवंडे परिसरात उपस्थित झाले असुन निळवंडे धरण परिसरात मोठा पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर या जलाशयाचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होत आहे हे भाग्य जिल्ह्याचे व तालुक्याचे असून जिल्ह्यातून लाखो शेतकरी शिर्डी येथे उपस्थित राहणार असल्याचे खा.लोखंडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शिदे गटाचे नगर संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, तालुका अध्यक्ष संजय वाकचौरे, राम तळेकर, अनिल वाकचौरे,विक्रम जगदाळे,पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार सतिष थेटेआदि उपस्थित होते.