अक्कलकोट : १८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४५ तर सदस्यपदासाठी १३४ उमेदवारांची माघार; २३ सदस्य बिनविरोध

अक्कलकोट : १८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४५ तर सदस्यपदासाठी १३४ उमेदवारांची माघार; २३ सदस्य बिनविरोध
Published on
Updated on

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीसाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकुण ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला तर सदस्यपदासाठी १३४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला अशी माहिती निवासी तहसिलदार विकास पवार यांनी दिली. आता १८ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी ५० उमेदवार तर सदस्यपदासाठी २९९ उमेदवार रिंगणात आहेत.

१८ ग्रामपंचायती च्या सरपंद पदापैकी एकही सरपंच पद बिनविरोध झाले नाही तर सदस्य पैकी २३ सदस्य बिनविरोध निवडुन आले.त्यापैकी सर्वाधिक सर्वच्या सर्व सात सदस्य कंठेहळ्ळीचे बिनविरोध झाले तर रामपूर इटगे चे सात पैकी सहा सदस्य बिनविरोध झाले.जकापूरचे एक,बिंजगेर हालहळ्ळीचे तीन,घुंगरेगांव एक व केगांव बु दोन, कल्लकर्जाळ एक व धारसंग दोन असे २३ सदस्य बिनविरोध निवडुन आले.

रामपूर/इटगे साठी २ सदस्य व ३ सरपंच, दहिटणे साठी ३४ सदस्य व ५ सरपंच, हसापूर १४ सदस्य व ४ सरपंच, नन्हेगांव १४ सदस्य व २ सरपंच, जकापूर १२ सदस्य व २ सरपंच,, कंठेहळ्ळी ० सदस्य व २ सरपंच, तळेवाड १५ सदस्य व २ सरपंच, बिंजगेर/हालहळ्ळी मै १६ सदस्य व ४ सरपंच, जेऊरवाडी १८ सदस्य व ३ सरपंच, करजगी ३२ सदस्य व ६ सरपंच, कुडल १४ सदस्य व २ सरपंच, शावळ २४ सदस्य व ३ सरपंच, घुंगरेगांव १२ सदस्य व २ सरपंच, केगांव बु १० सदस्य २ सरपंच केगांव खु १४ सदस्य व २ सरपंच, कल्लकर्जाळ १६ सदस्य व २ सरपंच, धारसंग ११ सदस्य व २ सरपंच, म्हैसलगे १८ सदस्य व २ सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत.११ गावात सरपंच पदासाठी थेट लढत होत आहेत तर उर्वरित सात गावात तिरंगी, चौरंगी लढत होत आहे.

अकरा गावांतील अकरा सदस्य जागेसाठी पोटनिवडणुक होत असुन १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. नागनहळ्ळीचा एकच सदस्य बिनविरोध निवडुन आला असुन चारच उमेदवार रिंगणात असुन कोर्सेगांव व हालअळ्ळी अ येथे दोन दोन उमेदवारात सरव लढत होत आहे तर उर्वरित सातनदुधनी, कलप्पावाडी, तोरणी, उडगी,जेऊर, हंजगी, संगोगी ब, आंदेवाडी खुll या आठ गावातील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारच नाही. संगोगी ब च्या तीनही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news