Crime News : ‘पोक्सो’तील आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

Crime News : ‘पोक्सो’तील आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी पोलिस ठाण्यामध्ये आरोपी शिवा उत्तम विधाते (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) यावर पोस्को अंतर्गत 2022 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी पोलिस प्रशासनाने तपास हाती घेतल्यानंतर पुरावे पाहता अतिरीक्त सह सत्र न्यायाधिश पी. आर. देशमुख यांनी आरोपीला दोषी मानत 3 वर्ष सक्त मजुरीव 5 हजार दंड अशी शिक्षा सुनावली. शिवा विधाते नामक आरोपीवर राहुरी पोलिस ठाण्यामध्ये पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सज्जन नर्‍हेडा, पोलिस हवालदार आर.व्ही. बोर्डे, पोलिस अंमलदार योगेश वाघ, अविनाश दुधाडे यांनी तपास करीत पुरावे सादर केले.

संबंधित बातम्या :

पोस्को न्यायालयामध्ये आरोपी विरोधात पुराव्यानुसार दोषी असल्याचे सिद्ध झाले. न्यायाधिश देशमुख यांनी संबंधित आरोपीला शिक्षा सुनावली आहे. 3 वर्ष सक्तमजुरी तसेच 5 हजार दंड भरण्यास सांगितले आहे. दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा राहणार आहे. राहुरी पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडितांना न्याय देण्यासाठी आरोपींना शिक्षा होत आहे. पोलिसांकडून योग्यरित्या कामकाज होत असल्याचे समाधान पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

 

Back to top button