Nagar News : लिलाव पुण्याचा अन् उपसा नगर जिल्ह्यात

Nagar News : लिलाव पुण्याचा अन् उपसा नगर जिल्ह्यात

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील निमोणे व चिंचणी येथील घोड नदीपात्रातील गाळमिश्रित वाळू उपसा व वाहतूक करण्यास पुणे जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे, तर प्रत्यक्षात वाळू उपसा वडगाव, शिंदोडी (ता. श्रीगोंदा) गावातून होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. हा उपसा थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून, आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
वडगाव-शिंदोडी भागातील हा वाळू उपसा न थांबल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. पुणे जिल्हाधिकार्‍यांनी घोड नदीपात्रातील मातीमिश्रित वाळू उपसा व वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

लिलावात उपसा करण्यासाठी जे गट दाखविण्यात आले, ते चिंचणी गावालगत नागनाथ मंदिरालगत आहेत. 1, 2, 47, 148, 164 हे गट लिलावात नमूद करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणाहून वाळू उपसा न करता चिंचणी धरण फुगवटा क्षेत्रातून म्हणजेच श्रीगोंदा हद्दीतून हा वाळू उपसा सुरू आहे. जवळपास 20 ते 25 बोटींच्या आधारे हा वाळू उपसा सुरू असून, आतापयर्र्ंत या भागातून पाच हजार ब्रास वाळू उपसा झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वडगाव-शिंदोडी भागातील वाळू उपसा तातडीने बंद न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत संबधित लिलावधारक एजन्सीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, संर्पक होऊ शकला नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news