नगर : पोलिस हवालदाराकडून लेडी कॉन्स्टेबलची छेड | पुढारी

नगर : पोलिस हवालदाराकडून लेडी कॉन्स्टेबलची छेड

नगर; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव उपविभागातील पोलिस ठाण्यात पोलिस हवालदाराने महिला पोलिस कर्मचार्‍याची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत पोलिस कर्मचार्‍याची तक्रार करण्यासाठी ती महिला पोलिस कर्मचारी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत गुरुवारी (दि.14) त्यांची भेट घेतली. अश्लील चाळे करून पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगणार्‍या त्या कर्मचार्‍यावर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

महिला पोलिस कर्मचारी आणि छेड काढणारा पोलिस हवालदार हे दोघेही एकाच पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील महिला कर्मचारी ड्युटीवर असताना हवालदाराने तिची छेड काढली. त्यानंतर महिलेेने पोलिस ठाण्यातच या हवालदाराला ‘प्रसाद’ दिल्याची चर्चा आहे. पोलिस ठाण्यातील इतर पोलिस अंमलदारांनीही या हवालदाराला धारेवर धरले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महिला पोलिस कर्मचारी पोलिस अधीक्षक यांच्याकडे संबंधित पोलिस हवालदाराची तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. पोलिस दलाची बेअब्रू करणार्‍या या पोलिसावर पोलिस अधीक्षक राकेश ओला काय निर्यय घेतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

पीआयची चुप्पी

पोलिस हवालदाराने छेड काढल्याच्या घटनेवर संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकार्‍यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. तसेच, अश्लील चाळे करणार्‍या या पोलिस हवालदाराने याआधी सुद्धा एका महिलेची छेड काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

भाजपची जम्बो नाशिक शहर कार्यकारिणी जाहीर, जुन्यांसह नवोदितांनाही संधी

पोटातले ओठावर आणताना भान ठेवा : राज ठाकरे

पुणे : ‘त्यांच्या’ मद्यधुंद रात्रींची पोलिसांना डोकेदुखी! परिमंडळ चारमध्ये विशेष मोहीम

Back to top button