Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मैदानात ! अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा आज दौरा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मैदानात ! अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा आज दौरा

पुढारी ऑनलाईन डेस्क: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंचा दौरा असल्याची सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर तसेच राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांशी ते संवाद साधणार आहेत.

दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी ठाकरे सेनेकडून आमदार शंकरराव गडाख यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणारे उद्धव ठाकरे काय राजकीय मांडणी करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईतून विमानाने ते काकडी विमानतळावर येणार असून तेथून ते श्री साईबाबा मंदिरात जातील. त्यानंतर ते शेतकर्‍यांशी संवाद साधणार असल्याचे समजते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news