

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आज केवळ मराठा समाजत नाही, तर धनगर, लिंगायत, यांसह अनेक जाती-धर्मांचे गोरगरीब नागरिक आरक्षण मागत आहेत. कोणाचेही आरक्षण कमी न करता किंवा काढून न घेता केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात विशेष कायदा करून त्यांना सर्वांना आरक्षण द्यावे, म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपेल. मात्र मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नयेत, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी आज केले.
कोपर्डी येथे ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आज तिसर्या दिवशीही सुरूच होते. आ. पवार यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राजेंद्र गुंड, श्याम कानगुडे, सुनील शेलार, विजय मोढळे, रघुनाथ काळदाते, स्वप्नील तनपुरे, गणेश जंजिरे यांच्यासह काही पदाधिकारी व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, कोपर्डी ग्रामस्थांनी कॅण्डल मार्च काढला. त्यात गावातील सर्व लहान मुले, विद्यार्थी, महिला सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा