कर्जत : सुमारे पाच टन भंडार्‍याची उधळण | पुढारी

कर्जत : सुमारे पाच टन भंडार्‍याची उधळण

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे संत बाळूमामा यांच्या पालखीची मोठ्या उत्साहात हजारो भाविकांनी मिरवणूक काढली. यावेळी तब्बल पाच टन भंडारा उधळण्यात आला. यानिमित्ताने बाळूमामाच्या सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात आले होते. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन संदीप रणसिंग, विजय सुद्रिक, तात्यासाहेब गावडे, अंकुश गावडे, बापू खताळ, दादा खताळ, गणेश सुद्रिक, राजेंद्र गावडे, कल्याण गावडे, विजय सुद्रिक, अंकुश पारखे, गोट्या पारखे, महादेव साबळे, अमोल गावडे, आशिष गावडे, संदीप गावडे, दीपक सुद्रिक, डॉ. सुनील गावडे, संजय सुद्रिक, उत्तम काळे, नवनाथ सोलंकर, रमेश सस्ते, हरिभाऊ सस्ते, महेश सस्ते यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केले होते.

बाळूमामा यांच्या पालखीचे कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक या ठिकाणी आगमन झाले. धार्मिक सप्ताहात रोज महाआरती महापूजा व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे व त्यानंतर महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत असे हजारो भाविक सहभागी झाले होते. पालखीच्या सोबत महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी तब्बल पाच टन भंडारा उधळण्यात आला. बाळूमामाचा गजर करून संपूर्ण गाव जयघोषाने दुमदुमून गेले होते.

हेही वाचा

पुण्यासाठी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी

शेवगाव : जळालेली पिके तहसीलदारांना भेट!

परभणी : मराठा आरक्षणासाठी सावरगावच्या महिला उपसरपंचाने दिला राजीनामा

Back to top button