अहमदनगर जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ओंकार हा साखर उद्योगातील राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा ग्रुप आहे. हिरडगाव येथील गौरी शुगरचा पहिलाच गाळप हंगाम आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यातील ऊसाला एक नंबरचा भाव देणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी दिली. हिरडगाव येथे गौरी शुगरचा रोलर पुजन समारंभ शुक्रवारी (दि.1) बाबुराव बोत्रे व रेखा बोत्रे यांचे हस्ते, तर 240 केपीएलडी क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे भूमिपूजन प्रशांत बोत्रे व शारदा बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

बाबुराव बोत्रे म्हणाले, आमदार बबनराव पाचपुते यांनी मोठे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आधुनिक प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी 12 वर्षांचे तप केले. पण, त्यांना का अपयश आले, हे समजले नाही. साखर निर्मिती करून ऊसाला भाव देता येणार नाही. व्यवसाय व व्यवहार डोळ्यासमोर ठेवून डिस्टीलरी क्षमता 240 केपीएलडीने वाढविणार आहे. त्यामुळे दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्माण होणार आहे. 24 टीपीएच क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्यात येईल.

प्रेसमडपासून दररोज 400 मेट्रिक टन पोटॅश तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते व आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत सहा महिन्यांत करण्यात येणार आहे. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले, बाबुराव बोत्रे यांनी गौरी शुगरच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 15 ऑक्टोबरला कारखाना सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज करणार आहे. यावेळी मिलिंद दरेकर यांचेही भाषण झाले. यावेळी उस्मानाबाद येथील लक्ष्मी शुगरच्या चेअरमन स्मिता पाटील, गणेशराव डोईफोडे, संपतराव दरेकर, संतोष दरेकर, गंगाराम दरेकर, दिनेश दरेकर उपस्थित होते. नवनाथ देवकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरी शुगरच्या चेअरमन गौरी बोत्रे यांनी आभार मानले.

हेही वाचा

बारामतीत पावसाची दडी ; पाण्यासह चार्‍याचा प्रश्न गंभीर

Pune Crime news : पुण्यात तब्बल ५०० किलो गांजा पकडला; एका महिलेसह चौघे ताब्यात

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा : विजय वडेट्टीवार

Back to top button