Pune Crime news : पुण्यात तब्बल ५०० किलो गांजा पकडला; एका महिलेसह चौघे ताब्यात

Pune Crime news : पुण्यात तब्बल ५०० किलो गांजा पकडला; एका महिलेसह चौघे ताब्यात

पुणे : आंध्रप्रदेशातून कर्जत येथ विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या गांजाची मोठी खेप पुण्यातील लोणीकंद परिसरात पोलिसांनी जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल पाचशे किलो गांजा वाहातुक करणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

यापूर्वीही अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या विरुद्ध मोहिम हाती घेत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना ताब्यांत घेण्यात आले आहे. कर्जत येथे हा गांजा विक्रीसाठी घेऊन चालले असताना त्यांना पकडण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातून हा गांजा आणण्यात आला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news