अहमदनगर : दुचाकी अडविल्याने पोलिसाची गंचांडी पकडली | पुढारी

अहमदनगर : दुचाकी अडविल्याने पोलिसाची गंचांडी पकडली

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नारळी पोर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या पद्मशाली समाजाच्या शोभायात्रा मिरवणुकीच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिस हवालदाराची एका गुन्हेगाराने गंचाडी पकडून शिवीगाळ केल्याची घटना घडली. तसेच, या गुन्हेगाराला तोफखाना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यातही गोंधळ घालत पोलिस अंमलदारांना दम भरला. पोलिस हवालदार अमोल गाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

नयन राजेंद्र तांदळे (वय 29, रा. पवननगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पद्मशाली समाजाच्या शोभायात्रा मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस हवालदार अमोल गाडे यांची नीलक्रांती चौकात थांबलेले असताना व वाहतूक नियमन करीत असताना आरोपी नयन तांदळे हा मद्यपान करून चारचाकी वाहनातून आला.

वाहतुकीला अडथळा होईल, म्हणून पोलिस हवालदार गाडे यांनी आरोपी तांदळे याला त्याचे वाहन रस्त्याने पलीकडून नेण्याचे सांगितले. मात्र, आरोपी दारूच्या नशेत गाडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांची गंचाडी पकडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलिस ठाण्यात आणले असता अंमलदार कक्षात आरोपीने गोंधळ घातला व पोलिस अंमलदारांना दमदाटी केली. तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

अहमदनगर : महापालिका कर्मचार्‍यांना ‘सातवा’ कधी?

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्गात परजिल्ह्यातील शिक्षकांना शाळेत रूजू होऊ देणार नाही! : अमित सामंत

Back to top button