Nagar Crime : मुख्याध्यापकाकडून 7 वी च्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

Nagar Crime : मुख्याध्यापकाकडून 7 वी च्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वर्गात केवळ हसला म्हणून मुख्याध्यापकाने 7 वी च्या वर्गातील विद्यार्थ्याला हाताने बेदम मारहाण केली. ही घटना राहुरी तालूक्यातील कोळेवाडी येथे घडली. नातेवाईकांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ओम विजय पाचारणे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळेवाडी (ता. राहुरी) या शाळेत इयत्ता 7 वी च्या वर्गात शिक्षण घेतो आणि कोळेवाडी येथेच राहतो. दिनांक 22 ऑगस्ट रोजी ओम पाचारणे हा विद्यार्थी सकाळी शाळेमध्ये गेला होता.

दुपारी चार वाजेच्या सुट्टीनंतर त्याचे वर्ग शिक्षक दाते हे मिटींगला गेले. त्यामुळे त्यांच्या वर्गातील सर्व मुलांना इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये बसविले होते. इयत्ता पाचवीचे वर्ग शिक्षक संजय कपिलेश्वर वायळ हे शाळेचे मुख्याधापक आहे. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास वर्गातील मुले हसले. तेव्हा वायळ यांना वाटले की, ओम पाचारणे हा हसला म्हणून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

अहमदनगर : शिक्षण परिषदेच्या वेळेत अखेर बदल

पारनेर : कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

पुणे : दागिने हिसकावणार्‍या हातात पडल्या बेड्या !

Back to top button